आमच्याविषयी
महाराष्ट्र राज्य सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण शिखर संस्था
सन ३१ ऑक्टोबर १९८६ मध्ये स्थापन झालेले पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. पुणे हे पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण सहकारी पतसंस्थांचे एकत्रित संघटन आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० नुसार नोंदणीकृत असलेले हे फेडरेशन पतसंस्थांच्या आर्थिक, प्रशासकीय, व कायदेशीर सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे.
सहकार क्षेत्रातील संस्थांना बळकट करण्यासाठी, मार्गदर्शन, सल्ला, प्रशिक्षण आणि सहकार्य देण्याच्या माध्यमातून फेडरेशनने सहकारी चळवळीत एक मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून स्थान निर्माण केले आहे.
आज फेडरेशन हे पतसंस्थांसाठी विश्वासार्ह, पारदर्शक व सक्षम सहकारी व्यासपीठ म्हणून ओळखले जाते.
अध्यक्षीय मनोगत
सन्माननीय सभासद बंधू आणि भगिनींस,
स्नेह पूर्ण नमस्कार,
फेडरेशनच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करताना अतिशय आनंद होत आहे. अशा प्रसंगी फेडरेशनचे संस्थापक स्व. आमदार शिवाजीराव भोसले (अण्णा) यांचीही स्मरण होत असते. तसेच, आपले पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचा ४० वा वार्षिक अहवाल, हिशोब पत्रके आपणास माहितीसाठी देत आहोत, त्याचे वाचन करून त्यास आपण सर्वानुमते मंजुरी द्यावी अशी आपणास विनंती आहे.
पतसंस्थांना कर्जवसुलीत सहाय्य व्हावे आणि त्यांची गुणवत्ता वाढावी या उद्देशांनी ३१ ऑक्टोबर १९८६ मध्ये या फेडरेशनची स्थापना केली. पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनला महाराष्ट्र शासन राजपत्र व साधारण एप्रिल २००४ मध्ये जाहिरपणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १० अन्वये संघीय संस्था (फेडरल) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. पुणे जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशन या संस्थेचे शिल्पकार स्व. आमदार शिवाजीराव भोसले (अण्णा) यांनी विधान परिषदेमध्ये विधेयक मांडून आणि त्याचे कायद्यात रूपांतर करून घेऊन त्यांनी सहकारी पतसंस्थांना कर्ज वसुलीसाठी कलम १०१ चा अधिकार मिळवून दिला.
फेडरेशनकडे पुणे जिल्ह्यातील पतसंस्थांचे थकबाकीदारांविरुद्ध कलम १०१ अन्वये वसुली दाखला प्राप्त करण्यासाठी पूर्णवेळ सहाय्यक निबंधक (परसेवा) यांची नियुक्ती केलेली आहे. सदर कलम १०१ चे कामकाज मुख्य कार्यालय शिवाजीनगर पुणे येथे सोमवार, मंगळवार नारायणगाव विभागीय कार्यालय येथे बुधवार, सांगवी विभागीय कार्यालय येथे गुरुवार व बारामती विभागीय कार्यालय येथे शुक्रवार या दिवशी दरमहा सुट्टीचे दिवस सोडून केले जाते. तसेच, ते प्राप्त झालेले कलम १०१ चे वसुली दाखले कलम १५६ अंतर्गत प्रत्यक्ष वसुली होणेकामी फेडरेशनचे वसुली अधिकारी यांच्या सेवा पुरविल्या जातात.
स्व. आमदार शिवाजीराव भोसले पतसंस्था प्रशिक्षण केंद्रास पतसंस्थांचे सभासद, संचालक, पदाधिकारी, अधिकारी व सेवक यांचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविणेसाठी दिनांक ११/२/२००४ रोजी मंजुरी मिळालेली. सदर प्रशिक्षण केंद्राची गुणवत्ता पाहून फेडरेशनचे प्रशिक्षण केंद्रास दि. ४/५/२००७ रोजी प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता दिलेली होती. १७ व्या घटना दुरुस्तीस अनुसरून दिनांक १० सप्टेंबर २०१४ च्या राज्य शासनाच्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम २४ क अन्वये राज्य शासनाने आपले फेडरेशनला पुणे जिल्हा क्षेत्रातील सहकारी पतसंस्थांपुरती सहकार शिक्षण व प्रशिक्षण शिखर संस्था अशी मान्यता दिली होती. आता दिनांक १७ जानेवारी २०२४ या अधिसूचनेद्वारे राज्यातील सहकार क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षणासाठी राज्यशिखर संस्था म्हणून मान्यता दिली आहे.
फेडरेशनमार्फत त्रैमासिक पतसंवाद अंक प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे पतसंस्थांना नवीन अध्यायात व उपयुक्त असणारी माहिती, परिपत्रके, संस्थांचे अहवाल, प्रशिक्षण कार्यक्रम माहिती तसेच तज्ञ व्याख्याते, वकील, सल्लागार यांचे मार्गदर्शनपर लेख प्रसिद्ध केले जातात. पतसंस्थांचे सभासद, पदाधिकारी, अधिकारी व सेवक यांनाही पतसंवाद अंकाचे वैयक्तिक वर्गणीदार करावे कारण पतसंवादद्वारे आपणाशी संवाद साधणे सोपे व सोयीस्कर होईल.
आपल्या पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मार्फत गेल्या २० वर्षांची परंपरा जोपासून २१ व्या वर्षात सर्व पतसंस्था पदाधिकारी, संचालक व कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्याने सन २०२६ ची पतपेढी दैनंदिनीचे प्रकाशन झालेले आहे. सदर दैनंदिनीत सर्व मंत्री महोदय, खासदार, आमदार, सहकार विभागाचे अधिकारी, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, हॉस्पिटल, ब्लड बँक, वृत्तपत्रे, रेल्वे इ. कार्यालयातील महत्वाचे व उपयुक्त संपर्क क्रमांक तसेच फेडरेशन पतसंस्थांना पुरवित असलेल्या विविध सेवा इ. ची माहिती याचा समावेश आहे. सदर दैनंदिनी फेडरेशनचे सभासद पतसंस्थांना मोफत वाटप करण्यात येते. सदर दैनंदिनीत जाहिरात दिलेल्या संस्था चालक, पदाधिकारी यांना धन्यवाद देऊन आभार मानते.
आपले पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनमार्फत स्व. आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कार सन २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. सदर पुरस्कार मिळणेकामी पतसंस्थांनी दिलेल्या नमुन्यातील सविस्तर प्रस्ताव तयार करून फेडरेशनकडे विहित नमुन्यामध्ये आवश्यक त्या कागदपत्रे पुराव्यासह सादर करणेबाबत पत्र पाठविलेले होते. त्यानुसार फेडरेशनने गठीत केलेल्या पुरस्कार समितीच्या वतीने आलेल्या प्रस्तावांची छाननी करून गुणवत्ता, गुण नमूद करून विहित मुद्द्यांमध्ये फेडरेशनच्या कार्यालयाकडे अभिप्रायासह प्रस्ताव सादर केल्यानंतर त्या गुणवत्तेनुसार संबंधित पतसंस्थांना जाहीर केल्याप्रमाणे स्व. आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कार फेडरेशनच्या दि. २८/०९/२०२५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे दिवशी समारंभात प्रदान करण्यात आले होते.
आर्थिक वर्ष संपत असलेने पतसंस्थांनी आपली वार्षिक वर्गणी तसेच भागाची (शेअर्स) ची दर्शनी किंमत १०००/- होती, ती रुपये २०००/- झालेली आहे. त्या वाढीव भागाची रक्कम भरणा करावी तसेच फेडरेशनची वार्षिक वर्गणी भरून सहकार्य करावे, फेडरेशन प्रसिद्ध करीत असलेल्या पतसंवाद या त्रैमासिकाची वार्षिक वर्गणी रुपये २३६/- भरून फेडरेशन देत असलेल्या सेवांचा लाभ घ्यावा.
फेडरेशनने केलेल्या कामकाजाची माहिती वेळोवेळी पतसंवाद अंकात दिलेली आहे. फेडरेशनचे मा. संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुली अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी, तज्ञ व्याख्याते, फेडरेशनचे सर्व कर्मचारी वृंद या सर्वांचे तसेच फेडरेशनचे सहाय्यक निबंधक (परसेवा) श्री. सुदाम म. तांदळे, फेडरेशनचे कायदेशीर सल्लागार अँड. के. ई. मांगले यांनी फेडरेशनचे अतिशय उत्कृष्ट काम करून आपला आगळावेगळा कर्तृत्वाचा ठसा उमटविलेला आहे. यामुळे या सर्वांसह आपण सर्वांचे मला असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते.
फेडरेशनचे भविष्यातील वाटचालीकरिता आपणाकडून याही पुढे सहकार्य मिळावे या अपेक्षेने आपणास यानिमित्ताने धन्यवाद देऊन आपले मनःपूर्वक आभार मानते.
जय हिंद, जय सहकार !
आपली हितचिंतक
रेश्मा अनिल भोसले
अध्यक्षा
पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन लि., पुणे
दृष्टी (Vision)
राज्यातील सर्व सहकारी पतसंस्थांना प्रशासकीय, आर्थिक व कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवून सहकार क्षेत्रात एक आदर्श संस्था निर्माण करणे.
ध्येय (Mission)
सहकारी पतसंस्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे, आदर्श सहकारी संस्था निर्माण करणे तसेच पारदर्शकता आणि विश्वासाहर्ता वाढविणे.

.jpg)
महाराष्ट्र शासनाची अधिसूचना
पुणे जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशनला राज्यस्तरीय प्रमुख प्रशिक्षण संस्थेची मान्यता
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 (कलम 114A उपकलम 1) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, पुणे यांना राज्यस्तरीय प्रमुख प्रशिक्षण संस्था (State Apex Training Institute) म्हणून मान्यता दिली आहे.
ही मान्यता सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्र अधिक मजबूत होणार असून, सहकारी संस्थांच्या कार्यक्षमतेत आणि ज्ञानवृद्धीत वाढ होणार आहे.
ही अधिसूचना श्री. राजेश कुमार, अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी राज्यपालांच्या नावाने निर्गमित केली आहे.
उद्दिष्टे
सहकारी पतसंस्थांच्या विकासासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण.
एकात्मता व बळकटी
जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांमध्ये एकात्मता निर्माण करणे व त्यांना बळकटी देणे.
पारदर्शकता व व्या वसायिकता
जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांमध्ये एकात्मता निर्माण करणे व त्यांना बळकटी देणे.
प्रक्रिया सुलभ करणे
थकबाकी वसुली, लेखापरीक्षण व कायदेशीर प्रक्रिया सुलभ करणे.
उच्च दर्जाचे प्रशिक्षण
“स्व. आमदार शिवाजीराव भोसले प्रशिक्षण केंद्र” मार्फत उच्च दर्जाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देणे.
आधुनिक तंत्रज्ञान
कोअर बँकींग, ऑनलाईन बँकींग व डिजिटायझेशन यंत्रणा विकसित करणे.
सल्ला व सहाय्य
पतसंस्थांना सहकार, वित्त, वसुली आणि कायदेशीर बाबींमध्ये सल्ला व सहाय्य देणे.
पुणे जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशनची स्थापना
फेडरेशनची स्थापना स्व. आमदार शिवाजीराव जगन्नाथराव भोसले यांच्या दूरदृष्टी व नेतृत्वाखाली करण्यात आली. सुरुवातीस फक्त ३७ पतसंस्था सभासद म्हणून जोडल्या गेल्या होत्या, तर आज फेडरेशनकडे १७०० हून अधिक सहकारी पतसंस्था सभासद आहेत.
गत तीन दशकांत फेडरेशनने सहकार क्षेत्रात अनेक ऐतिहासिक उपक्रम राबविले आहेत आणि महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रात पारदर्शकता, शिस्त व विकास यांचे नवीन मानदंड स्थापित केले आहेत.
.png)

मूल्ये
प्रामाणिकपण ा
सहकार्य
सक्षमीकरण
उत्तरदायित्व
शाश्वतता
FAQs
“आपल्या सर्व शंकांचे एकत्रित निरसन.”
- 01
- 02
- 03
- 04